जगभरातला सगळ्यात खतरनाक सेल्फी

सोशल नेटवर्किंगवर सध्या एका दाम्पत्याचा सेल्फी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Updated: Mar 31, 2016, 04:55 PM IST
जगभरातला सगळ्यात खतरनाक सेल्फी title=

मुंबई: सोशल नेटवर्किंगवर सध्या एका दाम्पत्याचा सेल्फी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ट्विटरवरून @itsthemans या अकाऊंटवरून टाकलेल्या या सेल्फीमध्ये हे दोघं हसताना दिसत आहेत, पण या फोटोला निरखून बघितलं तर तुम्हालाही धक्का बसेल. 

या फोटोच्या मागे असलेल्या आरशामध्ये एका महिलेची मान दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवर या फोटोवरून बरीच चर्चा सुरु आहे. हा फोटो फोटोशॉप केल्याचं काहींचं म्हणण आहे, तर या फोटोमध्ये दिसणारी तिसरी व्यक्ती भूत असल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली आहे.