www.24taas.com, मॉस्को
रशियातील पूर्व भागात आयोजित होणाऱ्या महत्वपूर्ण शिखर परिषदेपूर्वी जगातील सर्वांत लांबचक पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. रशियाचे पंतप्रधान दमित्री मेदवेदेव यांनी १.१०४ मीटल लांबीच्या पुलाचं उद्घाटन केलं.
हा पूल व्लादिवोस्तोक शहराला रस्की द्विपाशी जोडतो. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ऐपक शिखर परिषदेसंदर्भात केलेली ही एक मोठी कामगिरी मानण्यात येत आहे. या पुलामुळे रशियामधील गुंतवणुकीला चालना मिळेल, अशी आशा रशियन सरकारला आहे.
मेदवेदेव म्हणाले की आम्ही ज्या काही सुधारणा करत आहोत, त्या सर्व शिखर परिषदेसाठीच आहेत. मात्र, या पुलाचं बांधकाम शिखर परिषदेसाठी करण्यात आलं नसून सर्वसामान्य नागरिकांसाठी हा पूल बांधण्यात आला आहे.