झी २४ तास वेब टीम, पेनेन्सिल्व्हानिया
पूर्व अमेरिकेत तुफान बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बर्फवृष्टीमुळे जवळजवळ २० लाख घरांतली वीज गायब झाली आहे. बर्फवृष्टीमुळे विमानसेवेवरही परिणाम झालेला आहे. आतापर्यंत जवळपास एक हजार विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. तर काही निवडक विमानांचं उड्डाण उशिरानं सुरू होत आहे. त्यामुळं बाहेरगावी जाणारे विमान प्रवासी ठिकठिकाणच्या विमानतळांवर अडकून पडलेत. गेल्या तीन दिवसांपासून विमान उड्डाणांचं वेळापत्रक कोलमडून प़डली आहे. ठिकठिकाणी झाडं रस्त्यांवर कोसळून वाहनांचं नुकसान झालं आहे. या बर्फवृष्टीमुळे अमेरिकेतील पेनेन्सिल्व्हानिया प्रातांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सहसा ऑक्टोबर महिन्यात बर्फवृष्टी होत नाही. मात्र यंदा ऑक्टोबर महिन्यात बर्फवृष्टी झाल्यानं सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे