www.24taas.com,सान्तियागो
चिलीमध्ये आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.५ अशी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपामुळे समुद्राजवळील लोकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले. काही लोक रस्तावर धावत आलेत. राजधानी सान्तियागोमध्ये एक मिनिट हादरा जाणवला. त्यामुळे घबराट पसरली होती.
राजधानी सान्तियागोच्या दक्षिण भागापासून ३६० तर उत्तरेकडे ४२० किमी समुद्र किनाऱा परिसरातील लोकांना उंच ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान स्टिफन हार्पर दौऱ्यावर असताना भूकंपाने चिली जोरदार हादरले. भूकंपामुळे चिलीच्या राजधानीतील गगनचुंबी इमारती काही काळ डोलायला लागल्या होत्या. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
सान्तियागोपासून वायव्य दिशेला ११६ किलोमीटर अंतरावर असलेल्या वल्पारायसो या शहारापासून ४८ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जवळपास ३० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते.