लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये आर्ची, परश्याचा मेणाचा पुतळा

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमातून रातोरात स्टार बनलेले आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचे पुतळे लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये बनवण्यात आलेत. 

Updated: May 1, 2017, 01:50 PM IST
लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये आर्ची, परश्याचा मेणाचा पुतळा

लोणावळा : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमातून रातोरात स्टार बनलेले आर्ची आणि परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचे पुतळे लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये बनवण्यात आलेत. 

सैराटने मराठी सिनेसृष्टीत मोठा इतिहास रचला. जे आतापर्यंत कोणत्याच मराठी सिनेमाला जमले नव्हते ते या सिनेमाने करुन दाखवले. या सिनेमाने रिंकू आणि आकाशला स्टार बनवले.

लोणावळ्याच्या या वॅक्स म्युझियममध्ये रिंकू आणि आकाश यांच्या पुतळ्यासह दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचाही मेणाचा पुतळा बनवण्यात आलाय.