रणबीर ऐश्वर्याच्या 'ए दिल है मुश्किल'चा टीझर लॉंन्च

करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. 

Updated: Aug 30, 2016, 02:16 PM IST
रणबीर ऐश्वर्याच्या 'ए दिल है मुश्किल'चा टीझर लॉंन्च title=

मुंबई: करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. 

अभिनेता रणबीर कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, अनुष्का शर्मा आणि फवाद खान यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. धर्मा प्रॉडक्शनच्या 'ए दिल है मुश्किल'या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार प्रितम चक्रवर्तीने केले आहे.

एका गाण्याच्या स्वरूपात 'ए दिल है मुश्किल' च्या टीझरची सुरूवात होते. रणबीर या टीझरमध्ये गाताना दिसतोय. बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिेल्यानंतर करण जोहरचा 'ए दिल है मुश्किल' दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.