'शिवाय'च्या शोमधून शहिदांच्या कुटुंबियांना मदत

अजय देवगणचा शिवाय हा चित्रपट दिवाळीला म्हणजेच 28 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.

Updated: Oct 22, 2016, 07:03 PM IST
'शिवाय'च्या शोमधून शहिदांच्या कुटुंबियांना मदत title=

मुंबई : अजय देवगणचा शिवाय हा चित्रपट दिवाळीला म्हणजेच 28 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या एका शोची कमाई उरीमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशी जो शो सर्वाधिक कमाई करेल त्या शोची संपूर्ण रक्कम शहिदांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आणि दिग्दर्शन करणाऱ्या अजय देवगणनं चित्रपटाच्या डिस्ट्रीब्यूटरना या शोबाबत माहिती द्यायला सांगितलं आहे.