हाऊसफूल 3 च्या सक्सेस पार्टीवेळी रडला अक्षय

अभिनेता अक्षय कुमारचे या वर्षी आलेले एअरलिफ्ट आणि हाऊसफूल हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले.

Updated: Jun 10, 2016, 10:51 PM IST
हाऊसफूल 3 च्या सक्सेस पार्टीवेळी रडला अक्षय title=

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचे या वर्षी आलेले एअरलिफ्ट आणि हाऊसफूल हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले. या दोन्ही चित्रपटांमधल्या अक्षयच्या अभिनयाचं कौतुक होतं आहे. आत्तापर्यंत अनेक वर्ष अक्षयनं अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत पण या चित्रपटांसाठी अक्षयला अवॉर्ड मात्र मिळाले नाहीत. 

याबद्दलच अक्षयला हाऊसफूल 3 च्या सक्सेस पार्टीवेळी विचारण्यात आलं. पत्रकारानं हा प्रश्न विचारल्यावर अक्षय रडायला लागला. यावेळी अक्षयचे डोळे पुसायला रितेश देशमुख आला. अक्षय हा नाटक करत असल्याचं लक्षात आल्यावर मात्र या पार्टीला जमलेले सगळेच हसायला लागले. 

अवॉर्ड मिळत नसल्याचं उत्तर मात्र अक्षयनं मस्करीमध्येच दिलं. अवार्ड मिळत नाही म्हणून माझा काहीच आक्षेप नाही. मला रिवॉर्ड मिळतो आहे, कधी ना कधी मला अवॉर्ड नक्कीच मिळेल, असं अक्षय म्हणाला.