बाहुबलीमधल्या या अभिनेत्याला एका डोळ्याने दिसत नाही

'बाहुबली २' रिलीज झाल्यानंतर लोकांना हे माहित पडलं की कट्टपाने बाहुबलीला का मारलं. पण अनेकांना हे माहित नसेल की, सिनेमामध्ये भल्लाल देवची भूमिका करणारा अभिनेता राणा दग्गुबत्ती याला एका डोळ्याने दिसतच नाही.

Updated: May 3, 2017, 12:32 PM IST
बाहुबलीमधल्या या अभिनेत्याला एका डोळ्याने दिसत नाही title=

मुंबई : 'बाहुबली २' रिलीज झाल्यानंतर लोकांना हे माहित पडलं की कट्टपाने बाहुबलीला का मारलं. पण अनेकांना हे माहित नसेल की, सिनेमामध्ये भल्लाल देवची भूमिका करणारा अभिनेता राणा दग्गुबत्ती याला एका डोळ्याने दिसतच नाही.

राणा दग्गुबत्तीने सांगितलं की, त्याला एका डोळ्याने दिसत नाही. ही गोष्ट राणाने एका तेलुगू चॅनेलवरील शोमध्ये सांगितली आहे. या शोमध्ये सेलिब्रिटींना बोलावलं जातं आणि काही लोकांना मदत केली जाते. यामध्ये सेलिब्रिटींनी कमावलेली पैशांमधून १० टक्के रक्कम ते त्यांना मदत म्हणून देताता.

राणाने म्हटलं की, 'काय मी एक गोष्ट सांगू ? मला एका डोळ्याने दिसत नाही. मला फक्त एकाच डोळ्याने दिसतं. मी जर माझा हा डोळा बंद केला तर मला काहीच दिसणार नाही.'

पाहा व्हिडिओ