दिग्दर्शक रामगोपाल वर्मा विरूद्ध गुन्हा दाखल

गणपती बाप्पावर टीका करणाऱ्य़ा आणि धार्मिक भावना दुखावणारा बॉलिवूडचा दिग्दर्शक रामगोपाल वर्मा याच्या विरूद्ध हैदराबाद पोलिसांनी आज त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Updated: Aug 31, 2014, 09:36 PM IST
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा विरूद्ध गुन्हा दाखल title=

हैदराबाद : गणपती बाप्पावर टीका करणाऱ्य़ा आणि धार्मिक भावना दुखावणारा बॉलिवूडचा दिग्दर्शक रामगोपाल वर्मा याच्या विरूद्ध हैदराबाद पोलिसांनी आज त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी म्हटलं की, के. करूणासागर या वकिलानं सरूरनगर पोलिसात तक्रार करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सरूरनगरचे पोलीस इन्स्पेक्टर बी. नवीन रेड्डीने म्हटलं की, या बाबत कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर पोलिसांनी वर्मा विरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 153-ए (वेगवेगळ्या समुदायामध्ये धर्माच्या आधारावर शत्रुता वाढवण्याचा प्रयत्न करणे), 298 (व्यक्तिंच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्य़ा शब्दांचा वापर), 504 (शांति भंग करण्यासाठी मुद्दामून अपमान करणे) आणि 505 (खोड काढणार वक्तव्य करणे) या कलमाअतंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्य़ानं 'पीटीआय'ला सांगितलं.

वर्मांनी 29 ऑगस्टला गणपती बाप्पाबद्दल आक्षेपार्ह ट्विट करून वादाला आंमत्रण दिले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.