दंगलने दोन दिवसांत कमावले तब्बल ६४.६० कोटी रुपये

माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुलींच्या जीवनावर आधारित दंगल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय.

Updated: Dec 25, 2016, 12:31 PM IST
दंगलने दोन दिवसांत कमावले तब्बल ६४.६० कोटी रुपये title=

मुंबई : माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुलींच्या जीवनावर आधारित दंगल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय.

या सिनेमाने पहिल्या दोन दिवसांत तब्बल ६४.६० कोटी रुपयांची कमाई केलीये. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या सिनेमाने ३४. ८२ कोटी रुपये कमावले. 

भारतातच नव्हे तर न्यूझीलंड, यूके, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड या देशांमध्येही दंगल जबरदस्त कमाई करतोय.