एका 'किस'ची किंमत १५ लाख रुपये!

आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा 'किस' घेण्यासाठी तुम्ही किती रक्कम मोजू शकता? या प्रश्नाचं कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल...

Updated: Dec 19, 2014, 12:48 PM IST


अभिनेत्री डाएना अॅग्रोन

न्यूयॉर्क : आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा 'किस' घेण्यासाठी तुम्ही किती रक्कम मोजू शकता? या प्रश्नाचं कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल... पण, एका व्यक्तीनं मात्र खरोखरच एका अभिनेत्रीचा किस घेण्यासाठी तब्बल १५ लाख रुपये मोजलेत.

अमेरिकन टीव्ही अभिनेत्री डाएना अग्रोन एका सोशल नेटवर्किंग साईटच्या १० व्या वर्षपूर्तीनिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. याच कार्यक्रमात डिएनानं एका चॅरिटेबल इव्हेंटमध्येही सहभाग घेतला.  

या इव्हेंटमध्ये या अभिनेत्रीला किस करण्यासाठी बोली लावण्यात आली. ही बोली सुरू झाली १००० डॉलरपासून... ती पोहचली २३,००० डॉलर्सवर म्हणजेच जवळपास १४ लाख ६३ हजार ४९० रुपयांवर...

ठरल्याप्रमाणे बोलीमध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला डाएनानं 'किस' केलं. या मोबदल्यात तिला मिळालेली रक्कम युद्ध प्रभावित मुलांच्या मदतीसाठी खर्च केली जाणार आहे.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.