सिनेमा : डॉली की डोली
दिग्दर्शक : अभिषेक डोगरा
संगीत : साजिद - वाजिद
कलाकार : सोनम कपूर, राजकुमार राव, पुलकित सम्राट, वरुण शर्मा
वेळ : १०० मिनिटे
मुंबई : सोनम कपूर स्टारर 'डॉली की डोली' हा सिनेमाही या विकेंडला प्रदर्शित झालाय. अभिषेक डोगरा दिगदर्शित डॉली की डोली हा सिनेमा आहे एका लुटेरी दुल्हनवर आधारीत... पण, या सिनेमाचं कथानक मात्र वरवरचं वाटतं... लेखक किंवा दिग्दर्शकाला त्यात आत डोकावून पाहण्याची गरजच भासलेली दिसत नाहीय. हलकं-फुलकं मनोरंजन करणं एवढाच त्यांचा तो काय उद्देश असावा...
कथानक
'डॉली' (सोनम कपूर) ची एक टीम आहे.. यामध्ये, तिच्या भावाचा, वडिलांचा, आईचा आणि आजीचाही समावेश आहे. हे सगळे मिळून कोणाला तरी टार्गेट करण्याचे मागे आहेत. तिचा पहिला टार्गेट बनतो हरियाणाचा एक तरुण जी व्यक्तिरेखा साकारली आहे राजकुमाररावनं...
डॉलीचं प्रकरण रॉबिन सिंहजवळ ( पुलकित सम्राट) पोहचतं. तो डॉलीला अटक करण्यासाठी व्यूहरचना करतो आणि त्यात त्याला यशही मिळतं. पण, त्याला टपली मारून डॉली पुन्हा एक नवं सावज हेरण्यासाठी आपल्या मोहीमेवर निघते...
अभिनय
अभिनयाबाबत बोलायचं झालं तर राजकुमार राव असो, सोनम कपूर किंवा मोहम्मद आयुब या सगळ्यांनीच आपल्या भूमिका चांगल्या वठवल्यात.
राजकुमार रावनं एका ऊस शेतकऱ्याची सोनू सहरावतची भूमिका निभावलीय. हरियाणाची भाषा, संवाद, हेल आणि हाव-भाव त्यानं उत्तम वठवलेत. पुलकित सम्राटच्या अभिनयात सलमान खानची प्रतिमा थोटी खटकते.
शेवटी काय तर...
सिनेमाचा पहिला अर्धा भाग ठीक ठाक आहे. मात्र दुसऱ्या अर्ध्या भागात कुठलेही संदर्भ कुठेही जोडण्यात आलेत. सिनेमाची स्टोरी अत्यंत निरर्थक वाटते.
'डोली की डोली' एक असा सिनेमा आहे ज्यासाठी तुम्हाला डोकं घरीच ठेउन जावं लागेल. या सिनेमाला आम्ही देतोय २ स्टार्स...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.