सिनेमा : हॅपी एन्डींग
संगीत : सचिन - जिगर
दिग्दर्शक : राज निदीमोरु, कृष्णा डी. के
निर्माता : सैफ अली खान, दिनेश विजन, सुनील लुला
कलाकार : गोविंदा, सैफ अली खान, इलियाना डिक्रूझ, रणवीर शौरी, कल्कि कोचलीन
मुंबई : 'हॅपी एन्डींग' हा बॉलिवूडपट बॉक्स ऑफिसवर दाखल झालाय. सैफ अली खान, गोविंदा, इलियाना डिक्रुज आणि कल्की अशी तगडी स्टारकास्ट यात पहायला मिळतीय.
गोविंदाने जोरदार कमबॅक करत 'किल दिल'नंतर ही आणखी एक फिल्म त्याच्या चाहत्यांसाठी आणलीय, असं म्हणता येईल. 'हॅपी एन्डींग' ही कहाणी आहे एका हॉलिवूडपटाच्या लेखकाची. यू.डी. जेटली या लेखकाच्या जीवनावर आधारित असलेला हा सिनेमा आहे.
अभिनेता सैफ अली खान साकारलेल्या या यूडीचा स्वतःचा स्वतःशीच चाललेला संघर्ष यात रंगवण्यात आलाय... जीवनात आलेले बरे-वाईट अनुभव... आणि या सगळ्या संघर्षात आयुष्यात 'हॅपी एन्डींग' होण्यासाठीची चाललेली धडपड... खास हॉलिवूड मसाला घेऊन आलेला बॉलिवूडपट आहे, असं म्हणता येईल.
अभिनय
सैफ अली खान, गोविंदा, इलियाना डिक्रुज आणि कल्की अशी 'हॅपी एन्डींग' ची स्टारकास्ट आहे. या सिनेमाच्या निमित्तानं सैफ अली खान आणि गोविंदाची गाडी रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा जोमाने दौडू लागलीय. या दोघांच्याही फॅन फॉलोइंगमध्ये तसा प्रचंड फरक आहे. मात्र, गोविंदाच्या फॅन्ससाठी त्याचा एक वेगळा लूक पाहण्याची संधी यानिमित्ताने त्याच्या चाहत्यांना मिळणारे.
'हॅपी एन्डींग'मध्ये गोविंदा एक अभिनेता म्हणून पडद्यावर एक वेगळी भूमिका रंगवतोय. अर्थातच, याआधीही गोविंदाने अशा प्रकारचा रोल केलाय. मात्र, कमबॅकनंतर 'किल दिल' करणारा हा गोविंदा कसा आहे? हे पाहण्यासाठीही त्याचे चाहते नक्कीच उत्सूक असणार यात शंका नाही.
तर याच 'हॅपी एन्डींग'मध्ये एक सरप्राईजिंग एन्ट्रीही आहे. नवाब सैफची फिल्म असल्याने बेबो करिनाही यात एक स्पेशल अपिअरन्स दिलाय. प्रिती झिंटा आणि करिना कपूर या फिल्ममध्ये कॅमिओ करताहेत. आता त्यांचा हा कॅमिओ रोल नेमका काय आहे? हे पडद्यावर पाहणंच मजेशीर ठरेल.
स्पेशल अपिअरन्स...
एकूणच तुमचा विकेण्ड आनंददायी बनवण्यासाठी सैफ, गोविंदा, इलियाना अशा स्टार कास्टबरोबरच प्रिती झिंटा आणि करिनाही बॉक्स ऑफिसवर येताहेत खऱ्या... मात्र, सिनेमाचा एकूणच लूक पाहता एका चांगल्या स्टोरीवर काम करताना त्यात तरुणाईला आकर्षित करण्यासाठी उगाचच मसाला पॅकेजही कसं देता येईल, यावरच भर देण्यात आलाय. हा एक लाइट एन्टरटेनर सिनेमा आहे, हे नक्कीच पण सिनेमातले बोल्ड डायलॉग्स पाहता कौटुंबीक सिनेमा म्हणुन या सिनेमाकडे पाहणं, थोडंसं अवघडच म्हणावं लागेल.
आम्ही या सिनेमाला देतोय तीन स्टार...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.