अभिनेत्री रती अग्निहोत्री हिची पतीविरोधात तक्रार

अभिनेत्री रती अग्निहोत्री हिनं पतीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Updated: Mar 14, 2015, 10:39 PM IST
अभिनेत्री रती अग्निहोत्री हिची पतीविरोधात तक्रार title=

मुंबई : अभिनेत्री रती अग्निहोत्री हिनं पतीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अग्निहोत्री हिनं पती अनिल वीरवानी विरोधात तक्रार करताना छळवणूक आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिनं केलाय. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केलाय.

गेल्या अनेक वर्षांपासून पतीकडून अत्याचार होत असल्याचा आरोप तिचा आहे. रती अग्निहोत्रीला मनसे महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांना अनिल वीरवानीला अटक केली की नाही, हे समजू शकलेले नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.