हिमेश रेशमियाचा पुन्हा 'तेरा सुरूर'. ट्रेलर झाला रिलीज

गायक हिमेश रेशमिया पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात कमबॅक करतोय. त्याचा आगामी चित्रपट तेरा सुरुरचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Updated: Jan 28, 2016, 03:55 PM IST
हिमेश रेशमियाचा पुन्हा 'तेरा सुरूर'. ट्रेलर झाला रिलीज title=

मुंबई- गायक हिमेश रेशमिया पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात कमबॅक करतोय. त्याचा आगामी चित्रपट तेरा सुरुरचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हिमेशचा हा चित्रपट म्हणजे 2007 साली आलेला त्याचाच चित्रपट आपका सुरुरचा सिक्वल आहे. 
या चित्रपटामध्ये हिमेशबरोबर फराह करिमा, कबीर बेदी, नसरुद्दीन शहा आणि शेखर कपूर आहेत. तर शॉन अरान्हा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 11 मार्चला हा हिमेशचा 'तेरा सुरुर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

पाहा 'तेरा सुरुर'चा ट्रेलर