मुंबई : अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांची एंगेजमेंटची सध्या चर्चा सुरू आहे, या चर्चेमुळे अनुष्का चिंतीत झाली आहे. यावरून अनुष्काने थेट आपल्या फॅन्सना फेसबुकवर स्पष्टीकरण दिलेलं आहे.
मी एंगेज्ड नसल्याचं स्पष्टीकरण अनुष्काने आपल्या फेसबुक पेजवर दिलंय.
व्हिडीओ चॅटमध्ये अनुष्का म्हणते, "मी अजून एंगेज्ड नाही, माझा साखरपुडा अजून झालेला नाही, माझ्या बाबतीत अनेक अफवा आहेत, ज्या असत्य आहेत. मी प्रत्येक वेळी याबाबतीत मीडियात बोलू इच्छीत नाही, म्हणून मी आपल्या प्रशंसकांशी सरळ बोलतेय. मी आपल्या कामात समाधानी आहे, तसेच सध्या मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे".
अनुष्का शर्मा सध्या आमीर खानसोबत पीके नावाच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीत व्यस्त आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.