'कंगना करायची काळी जादू'

अभिनेत्री कंगना राणावत आणि ह्रतिक रोशन यांच्यामध्ये सध्या मोठा वाद सुरु आहे. या वादामध्ये आता कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमन यानं उडी घेतली आहे.

Updated: Apr 28, 2016, 03:50 PM IST
'कंगना करायची काळी जादू' title=

मुंबई: अभिनेत्री कंगना राणावत आणि ह्रतिक रोशन यांच्यामध्ये सध्या मोठा वाद सुरु आहे. या वादामध्ये आता कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमन यानं उडी घेतली आहे. कंगना काळी जादू करायची असा आरोप अध्ययननं केले आहेत. 

कंगनानं मला एकदा रात्री घरी बोलावलं आणि घरातल्या काळ्या कपड्यानं झाकलेल्या रुममध्ये ठेवलं. त्यावेळी घरामध्ये पूजा सुरु होती, कंगनानं मला मंत्र म्हणायला लावले, असे गंभीर आरोप अध्ययननं केले आहेत. तसंच कंगना मला पल्लवीकडे घेऊन जायची, पल्लवीनं मला काही गोष्टी दिल्या आणि त्या रात्री 12 वाजता स्मशानात टाकयला सांगितल्या असंही अध्ययन म्हणाला आहे. 

मी टॅरोट रिडरकडे गेलो असता पहाडी प्रदेशातील व्यक्ती तुझ्यावर काळी जादू करते, असा दावा अध्ययननं केला आहे. तसंच कंगना पूजा करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये जायची असंही अध्ययननं सांगितलं आहे. 

त्यावेळी मी कंगनाच्या प्रेमात होतो, त्यामुळे कोणीही तिच्याबद्दल बोललेलं मला चालायचं नाही, पण मी खूप रडायचो आणि दारू प्यायचो अशी प्रतिक्रिया अध्ययननं दिली आहे.