सैफसाठी करिनाने नाकारले चित्रपट

Updated: Jun 25, 2014, 08:15 PM IST
सैफसाठी करिनाने नाकारले चित्रपट  title=

मुंबईः बॉलिवूडची बेबो करिना कपूरचं लग्न झाल्यानंतर तिच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत. करिना कपूरचं सैफ अली खानसोबत लग्न झाल्यानंतर चित्रपटात काम करण्याच्या बाबतीत ती खूपच चूजी झालीय. करिना कपूरने सुजॉय घोष आणि आशुतोष गोवारीकराच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिलाय. 

'मी आता अशा ठिकाणी आहे तिथं माझी प्राथमिकता बदलली आहे. मी चित्रपट माझ्या वेळेनुसार करु शकते. आता मी विवाहीत आहे आणि मला माझ्या वैवाहिक जीवनासाठीही वेळ द्यायचा असतो. तीन महिन्यांसाठी आउटडोर शुटींग करणं मला शक्य नाही. याच कारणामुळं मी झोया अख्तरची फिल्म 'दिल धडकने दो'साठी नकार दिला. कारण तीन महिने क्रूजवर शुटिंग करणं मला शक्य नव्हतं', असं करिनानं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना म्हटलंय.

झोया अख्तरला 'दिल धडकने दो'साठी करिना कपूर आणि रणबीर कपूर यांना घेउन चित्रपट बनवायचा होता. मात्र आता रणवीर सिंग आणि प्रियंका चोप्राची निवड करण्यात आली. त्या चित्रपटात दोघे भाऊ-बहिणीची भूमिका करत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.