'लव्ह गुरू' सनी लिओन!

बॉलिवूडमध्ये झटपट स्टार बनलेली सनी लियॉन 'स्प्लिट्स विला सीझन - ८' मधून 'लव्ह गुरु'च्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

Updated: Jul 7, 2015, 02:11 PM IST
'लव्ह गुरू' सनी लिओन! title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये झटपट स्टार बनलेली सनी लियॉन 'स्प्लिट्स विला सीझन - ८' मधून 'लव्ह गुरु'च्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

पडद्यावर सदैव हॉट भूमिका साकारणाऱ्या सनीची प्रतिमा जरी पडद्यावर उजळ असली तरी प्रेमाविषयी सनी गांभीर्याने विचार करतेय. 

आजच्या पिढीपैंकी बरेच जण पैसा बघून प्रेम करतात. विशेषत: टीएनजर्समधील प्रेमाची व्याख्या तर पैशांवरुनच ठरते. पण वय वाढलं की कळतं, या सगळ्यापेक्षा प्रेम महत्त्वाचं आहे... तेव्हाच नात्याचं महत्त्व कळतं, असं परखड मत सनीने मांडलंय.

सनीची गाडी सध्या जोरात असून अनेक बड्या बॅनरचे सिनेमे सध्या सनीकडे आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सनीच्या 'लीला'नेही बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता. 

त्यामुळे सनीची लोकप्रियता कॅश करण्याचा सगळेच निर्माते सध्या प्रयत्न करताना दिसतायत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.