मोदींवर केलेल्या ट्विटवरुन मधुर भंडारकर यांचा अनुराग कश्यपवर निशाणा

अनुराग कश्यप यांनी करण जोहर यांच्या ऐ दिल है मुश्किल सिनेमावर बंदी घालण्यावरुन सुरु असलेल्या वादावर पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. पंचप्रधान मोदींवर केलेल्या या टीकेवरुन दिग्दर्शक मधूर भंडारकर यांनी अनुराग कश्यप यांच्यावर टीका केली आहे.

Updated: Oct 16, 2016, 05:37 PM IST
मोदींवर केलेल्या ट्विटवरुन मधुर भंडारकर यांचा अनुराग कश्यपवर निशाणा title=

मुंबई : अनुराग कश्यप यांनी करण जोहर यांच्या ऐ दिल है मुश्किल सिनेमावर बंदी घालण्यावरुन सुरु असलेल्या वादावर पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. पंचप्रधान मोदींवर केलेल्या या टीकेवरुन दिग्दर्शक मधूर भंडारकर यांनी अनुराग कश्यप यांच्यावर टीका केली आहे.

करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल या सिनेमावर बंदी घालण्यावरुन वाद सुरु असतानाच निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तानी भेटीवरुन त्यांच्यावर निशाणा साधलाय. ट्विटरवरुन अनुरागनं मोदींवर हल्लाबोल केलाय.

पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. त्या भेटीप्रकरणी अद्याप मोदींनी माफी का मागितली नाही असा सवाल अनुरागनं या ट्विटरमधून उपस्थित केला. यावर मधुर भंडारकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'ऐ दिल है मुश्किल सिनेमावरील बॅनसंबंधित वादावर पंतप्रधानांना प्रश्न करणे योग्य नाही. ही एक फॅशन बनली आहे की, काहीही झालं तरी मोदींना ट्विट आणि टॅग केलं जातं.'

'फिल्म असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं आम्ही स्वागत केलं आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी कसे दोषी ठरले ?' असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.