यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा डौलात फडकला आहे. सर्वोत्कृष्ट मनोरंजक सिनेमासाठी विकी डोनर ला पुरस्कार मिळाला आहे, तर सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म पान सिंग तोमर ठरली आहे. मराठी अभिनेत्री उषा जाधव हिला धग सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी इरफान खान सोबत विक्रम गोखले यांना विभागून पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्कार विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट अभिनेता- इरफान खान (पान सिंग तोमर) विक्रम गोखले (अनुमती)
- बेस्ट एडिटिंग- नम्रता राव – कहानी
- पान सिंग तोमर साठी पुरस्कार
पार्श्वगायक- शंकर महादेवन
- देख इंडियन सर्कस सिनेमाला अपॉर्ड
- बेस्ट सहाय्यक अभिनेता- अन्नु कपूर
- विकी डोनर सिनेमाला चित्रपटाचा पुरस्कार
- बेस्ट आर्ट कल्चरल फिल्म- मोदी खान्याच्या दोन गोष्टी
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- उषा जाधव (धग)
- बेस्ट पार्श्वगायिका- आरती अंकलीकर (संहिता)
- बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट- वीरेन प्रताप
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- शिवाजी पाटील (धग)-
सर्वोत्कृष्ट गीतकार - प्रसून जोशी|
- रत्नाकर मतकरींना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी रजत कमल
- स्पेशल ज्युरी अवॉर्ड- नवाजुद्दीन सिद्दिकी
- सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार- कहानी|
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- डॉली अहलुवालिया (विकी डोनर)
- सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- पं. बिरजू महाराज
- सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- इन्व्हेस्टमेंट