पूनम पांडे ख्रिसमसला चाहत्यांना देणार अनोखे गिफ्ट

बॉलीवू़डमधील नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे आपल्या ट्विटर फॉलोअर्सना २५ डिसेंबर रोजी खास व्हिडीओचे गिफ्ट देणार आहे. २०११ मध्ये पूनमने ट्विटर अकाऊंट सुरु केले होते. त्यानंतर आतापर्यंत तिचे ७,१८,०५७ फॉलोअर्स झालेत. 

Updated: Dec 21, 2015, 02:13 PM IST
पूनम पांडे ख्रिसमसला चाहत्यांना देणार अनोखे गिफ्ट title=

मुंबई : बॉलीवू़डमधील नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे आपल्या ट्विटर फॉलोअर्सना २५ डिसेंबर रोजी खास व्हिडीओचे गिफ्ट देणार आहे. २०११ मध्ये पूनमने ट्विटर अकाऊंट सुरु केले होते. त्यानंतर आतापर्यंत तिचे ७,१८,०५७ फॉलोअर्स झालेत. 

जेव्हापासून मी ट्विटर अकाऊंट सुरु केले तेव्हापासून फॉलोअर्सची संख्या वाढतेय. चाहत्यांनी नेहमीच माझे कौतुक केलेय. मात्र मी नियमितपणे व्हिडीओ अपलोड करत नसल्याची माझ्या चाहत्यांची तक्रार आहे. त्यामुळेच माझ्या चाहत्यांसाठी २५ डिसेंबरला मी व्हिडीओचे गिफ्ट देणार आहे. 

नशा चित्रपटातील अभिनेत्रीने गेल्या वर्षी एका व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्या व्हिडीओवरुन ती चांगलीच चर्चेत आली होती.