कपिल शर्माच्या सेटवर बाळ्याची मस्ती

कपिल शर्माच्या सेटवर सैराटच्या टीमने फुल टू धमाल केली. यावेळी सेटवर अनेक रंगतदार किस्सेही रंगले. 

Updated: Jun 13, 2016, 11:42 AM IST
कपिल शर्माच्या सेटवर बाळ्याची मस्ती title=

मुंबई : कपिल शर्माच्या सेटवर सैराटच्या टीमने फुल टू धमाल केली. यावेळी सेटवर अनेक रंगतदार किस्सेही रंगले. 

शोदरम्यान काही प्रेक्षकांना सैराटच्या कलाकारांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. यावेळी दिल्लीतल्या एका तरुणीने तानाजीच्या सैराटमधील भूमिकेचे तोंडभरुन कौतुक केले. 

तसेच त्याने बॉलीवूड स्टाईलमध्ये प्रपोज करण्याचीही विनंती केली. यावेळीही तानाजीनेही त्याच्या फॅनची ही इच्छा पूर्ण केली. तिचा हातात हात घेऊन तो म्हणाला मुझे बहुत पसंत आयी तुम. आय लव्ह यू. आय मिस यू असं तानाजी तिला म्हणाला.