मुंबई: दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे अंडरवर्ल्डवर आधारित सत्या आणि कंपनी या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा रामू अंडरवर्ल्डवर आधारित चित्रपट घेऊन येतोय. दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यातली दुश्मनी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
गव्हर्नमेंट असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. खुद्द रामूनंच या चित्रपटाबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. दाऊद आणि छोटा राजन यांच्यातली फूट आणि त्यानंतर अबू सालेमचा झालेला उदय याभोवती हा चित्रपट फिरेल असंही रामू म्हणाला आहे.
या मुख्य भूमिकांबरोबरच या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि अरुण गवळी यांची कॅरेक्टर्सही दाखवण्यात येणार आहेत.