सरकार-3 च्या प्रमूख भूमिकांची रामूनं केली घोषणा

दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं सरकार-3 या चित्रपटातल्या मुख्य भूमिकांची घोषणा केली आहे.

Updated: Oct 17, 2016, 07:32 PM IST
सरकार-3 च्या प्रमूख भूमिकांची रामूनं केली घोषणा title=

मुंबई : दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं सरकार-3 या चित्रपटातल्या मुख्य भूमिकांची घोषणा केली आहे. ट्विटरवरून रामूनं या चित्रपटात कोण असेल याची माहिती दिली. पहिल्या आणि दुसऱ्या सरकारप्रमाणेच या पार्टमध्येही सुभाष नागरेच्या भूमिकेत अमिताभ बच्चन असणार आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनना मात्र या चित्रपटातून डच्चू देण्यात आला आहे.

जॅकी श्रॉफ या चित्रपटामध्ये व्हिलनचा अभिनय करेल, रोनित रॉय गोकूळ साटमच्या भूमिकेत असणार आहे. गोकूळ साटम सुभाष नागरेचा उजवा हात दाखवण्यात येणार आहे. सरकार-3मध्ये अरविंद केजरीवालांच्या जवळ जाणारी भूमिका मनोज वाजपेयी करणार असल्याचं रामूनं सांगितलं आहे.

या चित्रपटात अमित सध सुभाष नागरेचा नातू असेल, तर यामी गौतम नागरेनं केलेल्या तिच्या वडिलांच्या खूनाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे. भरत दाभोळकर आणि रोहिणी हट्टंगडीही या चित्रपटामध्ये दिसतील. या सगळ्या अभिनेत्यांचा चित्रपटातला लूकही रामूनं शेअर केला आहे.

पाहा सरकार-3 मधल्या अभिनेत्यांचा फर्स्ट लूक