रणबीर-दीपिका पुन्हा येणार एकत्र

रणबीर आणि दिपीका, पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.

Updated: Feb 4, 2016, 10:45 PM IST
रणबीर-दीपिका पुन्हा येणार एकत्र

मुंबई: रणबीर आणि दिपीका, पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. 'तमाशा'मध्ये या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्यानंतर आता साजिद नाडियाडवाला पुन्हा एकदा या दोघांना घेऊन नवा चित्रपट घेऊन यायच्या तयारीमध्ये आहेत.

रणबीर आणि दीपिकानंही चित्रपटामध्ये काम करायची तयारी दर्शवली आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

 

तसंच साजिद नाडियाडवाला यांच्याकडेही चित्रपाटासाठी चांगल्या स्टोरी आयडिया आहेत, यापैकी रणबीर-दीपिका कोणती स्क्रिप्ट निवडतात, तसंच या दोघांच्या डेट्स या सगळ्यावर चित्रपटाचं भवितव्य अवलंबून असल्याचं बोललं जात आहे.