रणबीर माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग - कतरिना

Updated: Sep 18, 2014, 05:11 PM IST
रणबीर माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग - कतरिना title=

 

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन एक काळ लोटला आहे. पूर्वीची कतरिना आणि आताची कॅट, तिच्या अभिनयात कमालीचा फरक आपणास जाणवत आहे. आता ती अभिनयात परिपक्व झालेली दिसून येते. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखातीत कतरिना पहिल्यांदाच रणबीर कपूर सोबत असलेल्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे.

रणबीर कपूरशी असलेल्या नात्यावर बोलण्यासाठी तुम्ही तयार आहोत का? अस प्रश्न तिला विचारण्यात आला होता? 'रणबीर हा माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. मी रिलेशनशिपवर बोलणं खूप वेळा टाळते. पुढील काही वर्षी तरी लग्नासाठी मी तयार नाहीय', असं कॅटनं उत्तर दिलंय.

“स्पेनमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी गेले असताना माझे आणि रणबीरचे काही खासगी फोटो मीडियामध्ये लीक करण्यात आले होते. यामुळं मी मीडियावर प्रचंड चिडले होते आणि माझं चिडणं हे स्वाभाविकच होतं. कारण हे माझ्या खासगी आयुष्याचा एक भाग आहे. मला अजून ही असं वाटत आहे की, मीडियासाठी काही सीमा असणं गरजेचं आहे”, या शब्दात कॅटनं मीडियालाही सुनावलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.