रिव्ह्यू : 'बॉम्बे वेलवेट' - लोभ, प्रेम आणि कट यांचं अनोखं मिश्रण

Updated: May 15, 2015, 06:24 PM IST
रिव्ह्यू : 'बॉम्बे वेलवेट' - लोभ, प्रेम आणि कट यांचं अनोखं मिश्रण title=

कलाकार- रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, करण जोहर, मनिष चौधरी, सत्यदिप मिश्र, के.के. मेनन यांसारख्य़ा अभिनयानं परिपूर्ण कलाकारांची फौज या सिनेमात आहे. 

अपेक्षा पूर्ण नाही

'बॉम्बे वेलवेट' हा एक स्टायलिश काळातील सिनेमा आहे. मात्र सिनेमा त्याच्या अपेक्षांची पूर्तता करतांना दिसत नाही. दिग्दर्शक अनुराग कश्यपचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, काही तरी आव्हानात्मक करण्याचा प्रयत्न या सिनेमात अनुरागनं केला आहे. सिनेमात त्या काळातील झलक दाखवण्यात आली आहे, ज्यावेळी शहर जॅज म्युझिकमध्ये मंत्रमुग्ध होतं. 

अपुरी पटकथा
थोड्या अपूर्ण पटकथेच्या आधारावर सिनेमात ६०च्या दशकातील मुंबईच्या दोन्ही बाजू दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बॉम्बे वेलवेट हा सिनेमा प्रिंसटाउन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर ज्ञान प्रकाश यांच्या मुंबई 'फेबल्स' या पुस्तकावर आधारीत आहे. हा एक दमदार स्टार कास्ट आणि कलाकारांच्या झगझगाटानं भरलेला सिनेमा आहे. त्यामुळे बॉम्बे वेलवेटकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. 

फ्लॉप शेवट
सिनेमा अतिशय सुंदररित्या बनवण्यात आलं आहे. सिनेमासाठी केलेली मेहनत दिसून येते. सिनेमात जोश भरपूर आहे, मात्र शेवटी-शेवटी सिनेमातील रस निघून जातो, हे आश्चर्यकारक आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात लोभ, महत्वाकांक्षा आणि कट यांचं अनोख मिश्रण दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये प्रेम आहे आणि प्रेमात दिली जाणारी मनोरंजक वचनं आहेत. 

सिनेमाच्या दोन बाजू
तर सिनेमाच्या दुसऱ्या भागात मारामारी, गोळीबार यांची मालिका सुरू होते. सिनेमात एका बाजूला बॉक्सर जॉनी बलराज(रणबीर कपूर) आणि जॅज गायिका रोजी नोरोना (अनुष्का शर्मा) यांच्यात उंदीर आणि मांजराचा खेळ दाखवला गेला आहे, तर दुसरीकडे मीडियातील दिग्गज कैजाद खम्बाटा(करण जोहर) आणि समाचार पत्रचे संपादक जिम्मी मिस्त्री (मनिष चौधरी) यांच्यातही द्वंद्व चालू असतं. जे शेवटला एका भयानक अशा हिंसक दृश्यात रुपांतरीत होतं आणि सिनेमा यामध्ये संपून जातो. 

रणबीरचा दमदार अभिनय
सिनेमात रणबीर कपूरचा अभिनय प्रभावशाली आहे. एका जॅज गायिकेच्या भूमिकेत अनुष्का छान दिसतेय. मात्र, हे आश्चर्यकारक आहे की अभिनेता नसूनही अनुराग कश्यपनं करण जोहरमध्ये असं काय पाहिलं की त्यानं करणची खलनायकाच्या भूमिकेसाठी निवड केली. पहायला गेलं तर बॉम्बे वेलवेट सिनेमा ठीक-ठाक आहे. मात्र सिनेमाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा सिनेमा पूर्ण करतांना दिसत नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.