पाहा रिंकू, आकाश आणि नागराजचं ऑफिशियल पेज कोणतं?

सैराटची अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावावर अनेक फेक पेज फेसबुकवर बनवण्यात आले आहेत. 

Updated: May 16, 2016, 08:48 PM IST
पाहा रिंकू, आकाश आणि नागराजचं ऑफिशियल पेज कोणतं?

मुंबई : सैराटची अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावावर अनेक फेक पेज फेसबुकवर बनवण्यात आले आहेत. नेमके यांचे ऑफिशियल पेज कोणते आहेत, याची माहिती सैराट टीमने दिली आहे.

नागराज मंजुळेंनी त्यांच्या पेजवर लिहिलंय...
सध्या आर्चि-परशा ( रिंकू - आकाश ) यांचे अनेक Fake account आणि pages फेसबुक वर ओपन केले आहेत , यावर कोणत्याही बातम्या प्रसिद्ध होत आहेत, अफवा पसरवल्या जात आहेत. त्या बातम्यांना टीम सैराट , रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, नागराज मंजुळे जबाबदार नाहीत

https://www.facebook.com/Rinkurajguruu/

https://www.facebook.com/akash.thosar.16

https://www.facebook.com/nagraj.manjule

हे अनुक्रमे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर, नागराज मंजुळे यांचे फेसबुक accounts आहेत, यांनाच ग्राह्य धरले जावे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रिंकू आणि आकाश कार्यक्रमाला येणार आहेत, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्याचे होर्डिंग, whats up message पसरवले जात आहेत. अशा व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल...
- टीम सैराट