'ऐ दिल' की 'शिवाय'... कुणी मारलीय बॉक्स ऑफिसवर बाजी?

करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' आणि अजय देवगनच्या 'शिवाय' या दोन्ही सिनेमात बॉक्स ऑफिसवर काँटे की टक्कर बघायला मिळतेय. 

Updated: Nov 1, 2016, 07:24 PM IST
'ऐ दिल' की 'शिवाय'... कुणी मारलीय बॉक्स ऑफिसवर बाजी?

मुंबई : करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' आणि अजय देवगनच्या 'शिवाय' या दोन्ही सिनेमात बॉक्स ऑफिसवर काँटे की टक्कर बघायला मिळतेय. 

'ऐ दिल है मुश्किल'ने चार दिवसांमध्ये भारतात 54 कोटींची कमाई केलीय. तर दुसरीकडे 'शिवाय'नं चार दिवसांमध्ये भारतात 46 कोटींची कमाई केलीय. 

'शिवाय'नं चौथ्या दिवशी तब्बल 17 कोटींची कमाई केली असून माऊथ पब्लिसिटीचा फायदा या सिनेमाला मिळालाय. 

करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल'ने इंटरनॅशनल मार्केटमध्येही तब्बल 43.21 कोटींची कमाई केलीय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केट धरुन मिळून 'ऐ दिल है मुश्किल' 100 कोटी क्लबमध्ये दाखल झालाय.

दुसरीकडे अजय देवगणनेही काजोलबरोबर यूएसमध्ये 'शिवाय'चा जोरदार प्रचार केला होता. मात्र तरीही अजून अजयने इंटरनॅशनल मार्केटचे आकडे शेअर केलेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी 'ऐ दिल है मुश्किल' बॉक्स ऑफिसवर 'शिवाय'वर भारी पडल्याचंच चित्र दिसतंय.