दक्षिण आफ्रिकेची रॉलिन स्ट्रॉस मिस वर्ल्ड २०१४!

दक्षिण आफ्रिकेच्या रॉलिन स्ट्रॉसनं मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावलाय. २०१४च्या मिस वर्ल्ड किताबावर रॉलिननं आपलं नावं कोरलंय. त्यामुळं आता जगातील सर्वात सुंदर महिला दक्षिण आफ्रिकेतील असणार आहे.  

IANS | Updated: Dec 15, 2014, 01:01 PM IST
दक्षिण आफ्रिकेची रॉलिन स्ट्रॉस मिस वर्ल्ड २०१४! title=

लंडन: दक्षिण आफ्रिकेच्या रॉलिन स्ट्रॉसनं मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावलाय. २०१४च्या मिस वर्ल्ड किताबावर रॉलिननं आपलं नावं कोरलंय. त्यामुळं आता जगातील सर्वात सुंदर महिला दक्षिण आफ्रिकेतील असणार आहे.  

रॉलिन २२ वर्षांची आहे. सुरुवातीपासूनच तिनं या स्पर्धेत आघाडी घेतली होती. जगभरातून आलेल्या १२२ सौंदर्यवतींमधून तिची विश्वसुंदरी म्हणून निवड करण्यात आलीय. लंडनमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात रॉलिनच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा ताज चढवला गेलाय.  

यावेळी माजी मिस वर्ल्ड भारताची ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेक, मुलगी आराध्या आणि आई वृदांसोबत मिस वर्ल्ड सोहळ्याला उपस्थित होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.