एका बंगाली अभिनेत्रीशी केलं युवराज सिंगने चुकून लग्न

 स्टार क्रिकेटर युवराज सिंह याने कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या गर्लफ्रेंड आणि भावी पत्नी हेजल किन्चसह हजेरी लावली होती. पण या शोमध्ये त्याला एक सरप्राईज मिळाले. त्याने चुकून समोना चक्रवर्तीशी लग्न केले. 

Updated: Sep 20, 2016, 09:04 PM IST
एका बंगाली अभिनेत्रीशी केलं युवराज सिंगने चुकून लग्न  title=

मुंबई :  स्टार क्रिकेटर युवराज सिंह याने कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या गर्लफ्रेंड आणि भावी पत्नी हेजल किन्चसह हजेरी लावली होती. पण या शोमध्ये त्याला एक सरप्राईज मिळाले. त्याने चुकून समोना चक्रवर्तीशी लग्न केले. 

या शोमध्ये समोना ही सरला या मुलीचा रोल करत आहे. ती युवराज सिंगकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन येते. पण युवराजला काही कळण्याच्या आत लग्न होऊनही जाते. 

एकूण हा सीन खूपच हसविणारा होता. डॉक्टर मशूर गुलाटी (सुनील ग्रोव्हर) युवराजला कपिलच्या घरात पाहतो तेव्हा त्याला आपल्या हॉस्पिटलचे MRIमशीनचे उद्घाटन करण्यासाठी बोलावतो. त्यावेळी त्याचे स्वागत करण्यासाठी समोना म्हणजेच सरलाला सांगतो, ती त्याच्या गळ्यात हार टाकते आणि ती वरमाला होते...