सनी लिओन केवळ 27 'बिकिनी'त घालणार 'मस्ती'?

'मस्तीजादे' सिनेमात सनी लियॉन २७ बिकनी घालणार असल्याची चर्चा आहे... हा सिनेमा म्हणजे एक 'अडल्ट कॉमेडी' असून जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

Updated: Dec 9, 2015, 09:40 AM IST
सनी लिओन केवळ 27 'बिकिनी'त घालणार 'मस्ती'?  title=

मुंबई : 'मस्तीजादे' सिनेमात सनी लियॉन २७ बिकनी घालणार असल्याची चर्चा आहे... हा सिनेमा म्हणजे एक 'अडल्ट कॉमेडी' असून जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

सनी लिऑन बॉलिवूडमध्ये येऊन स्थिरावली असून त्याला आता काही काळ लोटला आहे. आयटम साँग ते हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असा प्रवास तिने एकता कपूरसारख्या निर्मातीच्या कृपेने पूर्ण केला आहे. मात्र, अजूनही एक चांगली अभिनेत्री म्हणून लौकिक मिळविण्याची तिची धडपड सध्या व्यर्थ ठरली आहे.

'मस्तीजादे' या तिच्या आगामी चित्रपटासाठी सनीला फक्त २७ बिकिनी देण्यात आल्या आहेत. संपूर्ण सिनेमात सनी केवळ २७ बिकनी घालणार असून यासाठी तिला तिचं वजन घटविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेत आली असून 'मस्तीजादे' सिनेमाबद्दल सगळ्यांचीच उत्सुकता वाढलीय.


चर्चेतली सनी

सिनेमात सनीबरोबर तुषार कपूर आणि रितेश देशमुखचीही महत्त्वपूर्ण भूमिका असून हा सेक्स कॉमेडी सिनेमा असणार आहे. सनीने 'जिस्म २' सिनेमद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जरी यश मिळाले नसले तरी सनीची मात्र सर्वत्र चर्चा झाली. यानंतर रागिनी एमएमएस 2, एक पहेली लीला सारखे सिनेमे सनीने केले..सनीच्या सिनेमांना जरी फारसे यश मिळत नसले तरी सनीची मात्र बॉलिवूडमध्ये प्रचंड डिमांड आहे.

त्यातच सनीने असहिष्णुतेवर बोलताना 'मी या देशात सुरक्षित' असल्याचं म्हटलं आहे. साहजिकच,यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. एकूणच सनी 'या ना त्या' कारणाने सतत चर्चेत राहत असल्यामुळे बी-टाऊनमधील मोस्ट डिमाडिंग एक्ट्रेस बनलीय. त्यामुळे सनीच्या या लोकप्रियतेचा आता 'मस्तीजादे'ला तरी फायदा होतो का हे बघणे उत्सुकतेचं ठरणार आहे.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.