चित्रपटसृष्टीतील जयललिता यांचा प्रेरणादायी प्रवास

 अभिनेत्री ते राजकारणी असा जयललिताा यांचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे.  भारतीय चित्रपटातील सर्वात महत्वाची अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या जयललिता जयललिता यांचा जन्म मैसूरमध्ये झाला. सध्या ते कर्नाटक राज्यात आहे. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मेलूकोटे येथे   तमिळ अय्यंगार कुटुंबात जयललिता यांचा जन्म झाला. त्याचे वडील जयराम हे पेशाने वकील होते. जयललिता २ वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना गमावले. 

Updated: Dec 6, 2016, 12:18 AM IST
चित्रपटसृष्टीतील जयललिता यांचा प्रेरणादायी प्रवास title=

 चेन्नई :  अभिनेत्री ते राजकारणी असा जयललिताा यांचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे.  भारतीय चित्रपटातील सर्वात महत्वाची अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या जयललिता जयललिता यांचा जन्म मैसूरमध्ये झाला. सध्या ते कर्नाटक राज्यात आहे. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मेलूकोटे येथे   तमिळ अय्यंगार कुटुंबात जयललिता यांचा जन्म झाला. त्याचे वडील जयराम हे पेशाने वकील होते. जयललिता २ वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना गमावले. 

त्यानंतर जयललिता यांचा भाऊ जयकुमार आणि आई बंगळुरू येथे स्थायिक झाल्या. 

जयललिता यांची आई वेदवती यांनी तमिळ सिनेमात संध्या नावाने काम करण्यास सुरूवात केली.  जय नावाचा अर्थ विजयी असा होता. त्यामुळे त्याचे वडील, भाऊ आणि त्यांच्या स्वतःच्या नावात जयचा वापर करण्यात आला आहे. 

- जयललिया यांनी आपले शालेय शिक्षण चैन्नईतील बिशप कॉटन गर्ल्स आणि चर्चपार्क कॉन्वेन्ट येथे झाले. 

- जयललिता यांनी भारतनाट्यम् शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्यांना कथ्थक, मोहिनी अट्टम आणि मणीपुरी हे नृत्यप्रकारही येत होते. 

- जयललिता यांनी आपल्या काही चित्रपटात गाणेही गायली आहेत. 

- जयललिता यांना इंग्लिश, हिंदी, तमिळ, कन्नड, तेलगु आणि मल्याळम भाषा बोलता येतात. 

आपल्या आईच्या पदचिन्हावर पाऊल टाकत जयललिता यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले.  त्यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात एका इंग्रजी चित्रपटातून केली, त्याचे शिर्षक होते  इपिसल हा १९६१ मध्ये प्रदर्शित झाला. 

पण त्यांनी अभिनेत्री म्हणून मुख्य भूमिका बी आर. पंथलू यांचा कन्नड चित्रपट 'चिनंदा गोबे' या १९६४ मध्ये केली. एका वर्षाच्या कालांतराने जया यांनी तमीळ चित्रपटात पदार्पण केले. सीव्ही श्रीधर यांच्या वेन्नीरा अडाई हा त्यांचा पहिला तमिळ सिनेमा... या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूम केली. या चित्रपटाची कथा लव ट्रायअँगल होती. यात श्रीकांत आणि निर्मला हे सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यानंतर एका वर्षाच्या कालावधीत त्यांनी तेलगु सिनेमा केला. त्याचे  नाव होते 'मनुशुला ममतालू' 

'पत्तीकाडा पट्टानामा' या शीर्षकाचा चित्रपट त्यांनी अभिनेत्री रेखाचे वडील शिवाजी गणेशन यांच्यासोबत १९७२ मध्ये केला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.  या चित्रपटाने पुन्हा चित्रपटसृष्टीत जम बसविण्यासाठी महत्त्वाचा ठरला. 

यानंतर पुढील तीन वर्ष जयललिता यांना मानाचा फिल्मफेअर पुरस्कार 'पत्तीकाडा पट्टानामा' 'सूर्यकांती' आणि 'श्री कृष्ण सत्य' या चित्रपटांसाठी मिळाला. 

जयललिता यांच्या 'दैव मगन' हा शिवाजी गणेशन यांच्या सोबतच्या चित्रपटाला ऑस्करसाठी पाठविलेला पहिला तमिळ चित्रपट म्हणून मान मिळाला. 

ऑनस्क्रीन केमिस्ट्री 

भारतीय चित्रपटात अनेक यश मिळविणाऱ्या जयललिता यांची तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज अभिनेता एमजी रामचंद्रन यांच्याशी ऑनस्क्रीन केमेस्ट्रीही भन्नाट होती. 'आईरथील उरूवन' हा चित्रपट टाइम ट्रॅव्हलवर आधारीत असलेल्या चित्रपटात एमजीआर आणि जयललिता यांच्या जोडीने ब्लॉकबस्टर कामगिरी केली. हा चित्रपट चेन्नईत १०० दिवस झळकला होता. 

'अदीमाई पेनन' हा जयललिता यांचा आणखी एक एमजीआर यांच्यासोबतचा चित्रपटाचा उल्लेखनीय होता. राजघराण्यावर हा चित्रपट बेतला होता. यासोबत जयललिता यांनी एमजीआर यांच्यासाोबत 'रागासिया पोलिस ११५' एक गूढ कथा असलेला चित्रपट, अरासा कथ्थालाई या चित्रपटातील संवाद खूप प्रसिद्ध झाले होते.  इन अन्नान या चित्रपटातही दोघांची जोडी होती. 

जयललिता यांनी 'कंदन कुरनाई' 'यार नी' (वो कोन थी या हिंदी चित्रपटाचा रिमेक) 'सूर्यकांती' हे देखील उल्लेखनीय चित्रपट केलेत. 

त्यांनी एका हिंदी चित्रपटातही काम गेले आहे. धर्मेंद्र यांच्या सोबत त्यांनी इज्जत या चित्रपटात काम केले होते.