ट्विंकल खन्नानं नसीरुद्दीन शाहला सुनावलं

अभिनेते राजेश खन्नांवर नसीरुद्दीन शाह यांनी टीका केली होती. 

Updated: Jul 24, 2016, 05:28 PM IST
ट्विंकल खन्नानं नसीरुद्दीन शाहला सुनावलं title=

मुंबई : अभिनेते राजेश खन्नांवर नसीरुद्दीन शाह यांनी टीका केली होती. 70 च्या दशकामध्ये चित्रपट उद्योगाला वाईट काळ आणण्यासाठी राजेश खन्ना जबाबदार आहेत. राजेश खन्ना हे एक कमजोर अभिनेते होते, असं नसीरुद्दीन शहा म्हणाले होते. 

नसीरुद्दीन शहांच्या या टीकेला राजेश खन्नांची मुलगी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नानं प्रत्युत्तर दिलं आहे. जर तुम्ही जिवंत व्यक्तीला सन्मान देत नसाल, तर निदान मृत व्यक्तीला तरी आदर द्या, असं ट्विट ट्विंकल खन्नानं केलं आहे.  करण जोहरनंही नसीरुद्दीन शहांच्या या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे. नसीरुद्दीन शहांचं हे वक्तव्य चांगलं नसल्याचं करण जोहर म्हणाला आहे.