वेश्यावृत्तीच्या व्यवसायात यायला माझ्यावर दबाव नव्हता- श्वेता प्रसाद

नॅशनल अॅवॉर्ड विजेती अभिनेत्री श्वेता बसू प्रसादनं आमचं सहकारी वृत्तपत्र डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय, की तिच्यावर वेश्याव्यवसायात उतरण्यासाठी कोणीही दबाव टाकला नव्हता. सेक्स रॅकेटमध्ये पकडल्या गेल्याच्या दोन महिन्यांनतर रेस्क्यू होममधून सुटलेल्या श्वेतानं पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिलाय. 

Updated: Nov 3, 2014, 02:05 PM IST
वेश्यावृत्तीच्या व्यवसायात यायला माझ्यावर दबाव नव्हता- श्वेता प्रसाद title=

मुंबई: नॅशनल अॅवॉर्ड विजेती अभिनेत्री श्वेता बसू प्रसादनं आमचं सहकारी वृत्तपत्र डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय, की तिच्यावर वेश्याव्यवसायात उतरण्यासाठी कोणीही दबाव टाकला नव्हता. सेक्स रॅकेटमध्ये पकडल्या गेल्याच्या दोन महिन्यांनतर रेस्क्यू होममधून सुटलेल्या श्वेतानं पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिलाय. 

डीएनएसोबत केलेल्या बातचितमध्ये श्वेतानं सांगितलं की, तिच्यावर वेश्याव्यवसायासाठी कधीही कुणी दबाव टाकला नाही. माझ्याजवळ चित्रपटांच्या खूप ऑफर होत्या आणि मला कसलीही कमतरता नव्हती. मात्र श्वेतानं सांगितलं की, माझ्याबद्दल या दोन महिन्यात अनेक बातम्या लिहिल्या गेल्या, रेस्क्यू होममधून बाहेर आल्यानंतर मला ही माहिती कळलीय.

श्वेतानं सेक्स रॅकेटमध्ये पकडल्या गेल्याची बातमी नाकारली नव्हती, पण मीडियानं माझ्या प्रतिक्रियेची वाट पाहायला हवी होती. श्वेता बसू सध्या आपलं आयुष्य नव्यानं सुरू करण्याचा प्रयत्न करतेय. सध्या ती हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर आधारित डॉक्युमेंट्रीमध्ये काम करतेय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.