पडद्यावर रजनीकांतची एंट्री झाली आणि...

सुपरस्टार रजनीकांतचा बहुप्रतिक्षित कबाली हा सिनेमा आज रिलीज झालाय. त्यामुळे सर्वत्र केवळ कबालीची हवा सुरु आहे.

Updated: Jul 22, 2016, 03:51 PM IST
पडद्यावर रजनीकांतची एंट्री झाली आणि... title=

मुंबई : सुपरस्टार रजनीकांतचा बहुप्रतिक्षित कबाली हा सिनेमा आज रिलीज झालाय. त्यामुळे सर्वत्र केवळ कबालीची हवा सुरु आहे.

या सिनेमाचे वीकेंडपर्यंतचे शोज आधीच हाऊसफुल्ल झालेत. रजनीकांतची देशभरात मोठी क्रेझ आहे. त्यांच्या फॅन्सची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे अनेकांनी आधीच कबालीचे तिकीच बुक केले होते.

कबाली चित्रपटाच्या सहाच्या शोला थिएटरमध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी होती. जेव्हा पडद्यावर रजनीकांतची एंट्री झाली तेव्हा तर प्रेक्षकांनी थिएटर दणाणून सोडले. टाळ्या, शिट्ट्यांचा गजर थिएटरमध्ये सुरु होता.