दहावं वरीस 'धोक्याचं', ब्ल्यू फिल्म पाहणं 'मोक्याचं'

एका संशोधनानुसार एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. व्यक्ती आपल्या किशोरवयातच ब्ल्यू फिल्म पाहण्यास सुरवात करतात. जवळजवळ वयाच्या १० व्या वर्षीच ब्ल्यू फिल्म पाहणं सुरू करतात.

Updated: Jan 30, 2012, 05:52 PM IST

झी २४ तास वेब टीम

एका संशोधनानुसार एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. व्यक्ती आपल्या किशोरवयातच ब्ल्यू फिल्म पाहण्यास सुरवात करतात. जवळजवळ वयाच्या १० व्या वर्षीच ब्ल्यू फिल्म पाहणं सुरू करतात.

संशोधनमध्ये असं समोर आलं आहे की, ब्ल्यू फिल्म पाहण्याचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे इंटरनेट आहे. किशोरवस्थेत असणाऱ्या ९० टक्के मुलांना अश्लील फिल्म या इटंरनेटच्या माध्यमातून मिळतात तर जवळजवळ १० टक्के व्हिडिओच्या माध्यमातून ब्ल्यू फिल्मचं वितरण होतं.

संशोधनकर्त्यांचं असंही म्हणंण आहे की, एखादी व्यक्ती आठवड्यातून जवळजवळ तीन वेळेस आणि चाळीस मिनीटापर्यंत अश्लील फिल्म पाहतात.. तर लग्न झालेले पुरूष हेदेखील आठवड्यात दोनदा आणि जवळजवळ २० मिनटं ब्ल्यू फिल्म पाहण्यात मशगूल असतात.