एक्झिट पोलमध्ये हरियाणात भाजप अव्वल!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जवळपास ६२ टक्के मतदान झालं असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. तर हरियाणामध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७३ टक्के मतदान झालंय. झी मीडिया आणि तालिमच्या एक्झिटपोलनुसार दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्या नंबरवर असेल.

Updated: Oct 15, 2014, 08:08 PM IST
एक्झिट पोलमध्ये हरियाणात भाजप अव्वल! title=

चंडीगड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जवळपास ६२ टक्के मतदान झालं असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. तर हरियाणामध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७३ टक्के मतदान झालंय. झी मीडिया आणि तालिमच्या एक्झिटपोलनुसार दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्या नंबरवर असेल.

हरियाणातील स्थिती

> टाईम्स नाई/सी वोटर - भाजपा- 37, काँग्रेस- 15, आईएनएलडी- 28, हजकां- 6 आणि इतर 4 जागा

> एबीपी न्यूज/नेल्सन - भाजपा - 46, आईएनएलडी - 29 आणि काँग्रेस - 10 जागा

२००९मध्ये हरियाणात काँग्रेसला ४० आणि एनलोला ३१ जागा मिळाल्या.

हरियाणात कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये सकाळी ७पासून ९० विधानसभा जागांवर मतदान सुरू झालं. मतदानानंतर १३५१ उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय.

फतेहाबाद, हिस्सार, गुडगाव, जींद, मेवात, पलवल आणि यमुनानगरमध्ये मतदानाची टक्केवारी चांगली राहिली. तर पंचकुला, करनाल आणि रेवाडी जिल्ह्यांसह इतर जागांवर मतदान सरासरी झालं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.