महाराष्ट्रातील 'या' मतदारांना करता येतं दोनदा मतदान

भारताच्या राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला केवळ एका मताचा अधिकार दिलाय. मात्र महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरची काही गावं अशी आहेत, की जी दोन्हीकडे मतदान करतात.

Updated: Oct 15, 2014, 10:59 AM IST
महाराष्ट्रातील 'या' मतदारांना करता येतं दोनदा मतदान  title=

मुंबई : भारताच्या राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला केवळ एका मताचा अधिकार दिलाय. मात्र महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरची काही गावं अशी आहेत, की जी दोन्हीकडे मतदान करतात.

सीमावादात अडकलेल्या या साडेबारा गावांमधल्या ३००० नागरिकांकडे दोन्ही राज्यांची मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्डही आहेत. हे नागरिक आज महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान करणार करणार आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी मतदान असेल, तरी त्यांचं अडत नाही. 

महत्त्वाचं म्हणजे, पहिल्यांदा तेलंगणात मतदान केल्यानंतर महाराष्ट्रात त्यांना दुसऱ्यांदा मत द्यायला परवानगी दिली जात नाही. परंतु, याउलट महाराष्ट्रात मतदान केल्यानंतर मधल्या बोटावर शाई लावून दुसऱ्यांदा तेलंगणामध्ये मतदान करायचं असेल तर त्यांना करता येतं. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गावकऱ्यांनी असं दोनदा मतदान केलंय. सीमेवरून वाद असल्यामुळे दोन्ही राज्यांनी आपल्याला ओळखपत्र दिल्याचं माजी सरपंच चंदू देवसिंग पवार यांनी सांगितलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.