पुण्यात 1.12 कोटींची रोकड जप्त, एकाला अटक

शहरात 1 कोटी 12 लाख 50 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या सगळ्या नोटा जुन्या चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा होत्या.

Updated: Nov 25, 2016, 12:47 PM IST
पुण्यात 1.12 कोटींची रोकड जप्त, एकाला अटक title=

पुणे : शहरात 1 कोटी 12 लाख 50 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या सगळ्या नोटा जुन्या चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा होत्या.

काळापैसा पांढरा करुन देण्याच्या प्रकार असल्याची चर्चा आहे. या रोकड प्रकणी पोलिसांनी भरत शहा या आरोपीला अटक केली आहे. पुण्यामधील कॅम्प परिसरातील कॅनरा बँकेसमोर पोलिसांनी ही कारवाई केली.