अफवांवर विश्वास ठेवू नका, दहावीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर होणार

सध्या व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावर दहावी निकालाच्या तारखेबद्दल विविध मॅसेज फिरत आहेत. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. पण आता या अफवांना पूर्णविराम मिळणार आहे. कारण आठवड्याच्या अखेरीस अधिकृतरित्या निकालाची तारीख जाहीर होणार आहे.

Updated: Jun 4, 2015, 12:36 PM IST
अफवांवर विश्वास ठेवू नका, दहावीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर होणार  title=

पुणे: सध्या व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावर दहावी निकालाच्या तारखेबद्दल विविध मॅसेज फिरत आहेत. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. पण आता या अफवांना पूर्णविराम मिळणार आहे. कारण आठवड्याच्या अखेरीस अधिकृतरित्या निकालाची तारीख जाहीर होणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाराम म्हम्हाणे यांनी माहिती दिलीय. त्यामुळं आता लवकरच दहावीच्या निकालाची तारीख जाहीर होईल. तोपर्यंत विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. 

बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता दहावीच्या निकालाची आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.