पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघातात दोन ठार

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटात खोपोली एक्झिटजवळ झालेल्या भीषण अपघातात 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय. तर 3 जण गंभीर जखमी झालेत. या अपघातात इतर 4 महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.  

Updated: Mar 17, 2016, 11:19 AM IST
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघातात दोन ठार

खोपोली : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटात खोपोली एक्झिटजवळ झालेल्या भीषण अपघातात 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय. तर 3 जण गंभीर जखमी झालेत. या अपघातात इतर 4 महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.  

कर्नाटकहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासी बसला आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाने बस दोन्ही लेनच्यामध्ये असणाऱ्या पुलाच्या कठड्याला बस धडकावून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र बस धडकल्यावर बसच्या केबिन मध्ये बसलेले चार लोक काच फुटून पुलाखालील दरीत कोसळले. 

यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांसह तीन जण गंभीर जखमी झाले. याबसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. अपघातात इतर 4 महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x