पुणे: सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पुणे पोलिसांनी चक्क प्लँचेटची मदत घेतली होती, असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. म्हणूनच तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची बदली करण्यात आल्याची कबुलीही अजितदादांनी दिलीय.
पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या आदेशानुसार तपासात प्लँचेटचा आधार घेण्यात आला. गुलाबराव पोळ यांनी प्लँचेट केल्याचा आरोप नाकारला होता. शोधपत्रकार आशिष खेतान यांनी एका स्टिंग ऑपरेशनद्वारे हा प्लँचेटचा प्रकार उघड केला होता.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली त्यावेळी गुलाबराव पोळ हे पुण्याच्या पोलीस आयुक्तपदावर कार्यरत होते. अनेक महिने उलटल्यानंतरही या प्रकरणात काहीच धागेदोरे हाती येत नसल्यानं गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी त्यांनी एका निवृत्त हवालदाराच्या मदतीनं प्लँचेट केल्याचा आरोप आशिष खेतान यांनी केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.