आळंदीकरांनी घेतलीय 'इंद्रायणी'ची स्वच्छता मोहीम

अवघ्या महाराष्ट्राचं धार्मिक अधिष्ठान म्हणून देवाच्या आळंदीच वर्णन केलं जात. इथून संथ वाहणाऱ्या इंद्रायणी मध्ये स्नान करुन अनेक भक्त मोक्षाची प्राप्ती करतात. पण गेल्या काही वर्षात याच इंद्रायणी नदीची अवस्था गटार गंगे सारखी झालीय. आता याच इंद्रायणीच पावित्र्य जपण्यासाठी आळंदीमधल्या नागरिकांनीच पुढाकार घेतलाय.

Updated: Dec 9, 2014, 10:02 PM IST
आळंदीकरांनी घेतलीय 'इंद्रायणी'ची स्वच्छता मोहीम title=

पुणे : अवघ्या महाराष्ट्राचं धार्मिक अधिष्ठान म्हणून देवाच्या आळंदीच वर्णन केलं जात. इथून संथ वाहणाऱ्या इंद्रायणी मध्ये स्नान करुन अनेक भक्त मोक्षाची प्राप्ती करतात. पण गेल्या काही वर्षात याच इंद्रायणी नदीची अवस्था गटार गंगे सारखी झालीय. आता याच इंद्रायणीच पावित्र्य जपण्यासाठी आळंदीमधल्या नागरिकांनीच पुढाकार घेतलाय.

कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आळंदीकरांनी स्वत:च इंद्रायणी स्वच्छता हाती घेतलीय. आळंदी संत ज्ञानेश्वरांच्या  पदस्पर्शान पावण झालेली भूमी. संथ वाहणारी इंद्रायणी म्हणजे मोक्षाचं प्रवेशद्वारचं मानलं जातं. पण पिंपरी चिंचवड, चाकण परिसरातल्या काही कंपन्या इंद्रायणीनदीमध्ये रासायनिक पाणी सोडतात. इतर प्रकारची घाण वेगळीच. त्यामुळे या इंद्रायणीचं पावित्र्यच धोक्यात आलंय. 

आता मात्र आळंदीकरांनी इंद्रायणी स्वच्छ करायची ठरवलीय. स्वच्छतेचं महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छता अभियान राबवलय. त्याचं महत्व आळंदीकराना चांगलंच पटलंय. एकीकड पंढरपूरमध्ये वारीमध्ये होत असलेल्या अस्वच्छतेमुळ वारीचं बंद करण्याचा इशारा दिलाय. दूसरीकड स्वच्छतेच महत्व लक्षात घेत आळंदी करांनी इंद्रायणीच पावित्र्य जपण्याचा सुरु केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे… 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.