८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन

८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन  दीपप्रज्वलन कार्यक्रमाने झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, पालक मंत्री गिरीश बापट ,गुलजार नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी.पाटील, माधवी वैद्य, मावळते अध्यक्ष सदानंद मोरे उपस्थित होते. कार्यकक्रमाला मराठी गीतांनी कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. 

Updated: Jan 16, 2016, 01:20 PM IST
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन  title=

पिंपरी, पुणे : ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन  दीपप्रज्वलन कार्यक्रमाने झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, पालक मंत्री गिरीश बापट ,गुलजार नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी.पाटील, माधवी वैद्य, मावळते अध्यक्ष सदानंद मोरे उपस्थित होते. कार्यकक्रमाला मराठी गीतांनी कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. 

नियोजीत अध्यक्ष श्रीपाल सबनीय यांनी पंतप्रधान नरेंद्रम मोदींवर जाहीर आणि जहरी टीका केली होती. त्यामुळे भाजपने सबनीस यांच्याविरोधात आंदोलन केले होते. सबनीस यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर भाजपचा विरोध मावळा. आज कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी दाखल झालेत. त्यांनी व्यासपीठावर उपस्थिती लावले. आहेत.

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमस्थळी विविध राजकीय पक्षांचे मान्यवर उपस्थित असून त्यामध्ये अजित पवार, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, श्रीरंग बारणे आदींचा समावेश आहे. याशिवाय साहित्य-राजकारण क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरही कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत. ‘मराठी असे आमची मायभूमी‘ हे समूहगीत यावेळी सादर करण्यात आले.

स्वागत गीत