उमेदवाराच्या गंभीर गुन्ह्याची यादी मतदान केंद्राबाहेर लावणार

गुन्हेगारी पाश्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती आता निवडणूक आयोग देणार आहे, एवढंच नाही त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराची माहितीच मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 18, 2017, 03:25 PM IST
उमेदवाराच्या गंभीर गुन्ह्याची यादी मतदान केंद्राबाहेर लावणार title=

नागपूर : गुन्हेगारी पाश्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती आता निवडणूक आयोग देणार आहे, एवढंच नाही त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराची माहितीच मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार आहे. राजकारणातील गुन्हेगारी आणि राजकारणात गुंडांचा वाढता वावर, हा सर्वांसाठी तसा डोकेदुखीचा विषय आहे, तो आता संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत.

महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं वातावरण आहे, यात गंभीर गुन्हे असलेल्यांना उमेदवारी मिळत असल्याची चर्चा आहे. आपल्या उमेदवारावर किती गुन्हे आहेत, हे मतदाराना माहित होत नाही, कारण यापूर्वी ही माहिती फक्त उमेदवारीचा फॉर्म भरताना प्रतिज्ञापत्रासोबत दिली जात होती, मात्र आता या गुन्ह्यांची यादी मतदार केंद्राबाहेर लावली जाणार आहे, त्यामुळे उमेदवाराची गंभीर गुन्हेगार पार्श्वभूमी दिसणार आहे.

नागपूर महापालिका निवडणुकीत हा फंडा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी का होईना, राजकीय पक्षांना गुन्हेगारांपासून दूरच राहावे लागेल. मतदान केंद्राच्या बाहेर फ्लेक्स लावून उमेदवाराची ‘कारकीर्द’ जाहीर करण्यात येईल.