एफटीआयआयच्या ३५ विद्यार्थ्यांविरोधात आरोपपत्र

एफटीआयआयच्या ३५ विद्यार्थ्यांविरोधात गुन्ह्याच्या उद्देशआनं एकत्र येणे, आणि दंगल करणे यासासाखे आरोप असणारं आरोपपत्र पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात दाखल करण्यात आले आहे.

Updated: Mar 15, 2016, 10:56 AM IST
एफटीआयआयच्या  ३५ विद्यार्थ्यांविरोधात आरोपपत्र title=

पुणे : एफटीआयआयच्या ३५ विद्यार्थ्यांविरोधात गुन्ह्याच्या उद्देशआनं एकत्र येणे, आणि दंगल करणे यासासाखे आरोप असणारं आरोपपत्र पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात दाखल करण्यात आले आहे.

७ महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळामध्ये १७ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांची जामिनावर सुटकाही झाली होती. त्यानंतर पोलिसांनी व्हिडिओ फुटेजच्या आधारे आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या आणखी १८ संशयितांना शुक्रवारी नोटीसा बजावल्या.

शुक्रवारी या सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर काल ३५ विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांनी आज आरोपपत्र दाखल केलं. एटीआयआयच्या नियामक मंडळावर अभिनेता गजेंद्र चव्हाण यांच्यासह संघाशी संबंधित इतर सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याच्या विरोधात हे आंदोलन झालं होतं.

पुढील सुनावनी 2 एप्रिल पासून सुरू होणार आहे. दरम्यान आपला न्यायव्यवस्थेवर विश्वार असून यातून नक्कीच आपल्याला क्लिनचीट मिळेल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय.