'खडसे-दाऊद यांच्यात संभाषण नाही'

राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे.

Updated: Jul 18, 2016, 03:23 PM IST
'खडसे-दाऊद यांच्यात संभाषण नाही' title=

मुंबई : राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यामध्ये फोनवरून कुठलंही संभाषण झालं नाही, असं एटीएसनं मुंबई हायकोर्टाला दिलेल्या माहितीमध्ये म्हंटलं आहे.

याआधी शनिवारीच एकनाथ खडसेंना गजानन पाटील लाचखोरी प्रकरणी एसीबीनं क्लीन चीट दिली होती. विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात खडसेंच्या नावाचा उल्लेखच नाही. गजानन पाटील लाच प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एसीबी न्यायालयात, एसीबीनं आरोपपत्र दाखल केले आहे. त्या आरोपपत्रात एकनाथ खडसेंच्या नावाचा समावेश नाही.

दाऊद इब्राहिम फोन संभाषण प्रकरण, गजानन पाटील लाच प्रकरण आणि पुणे एमआयडीसीतीस जमीन प्रकरणी आरोप झाल्यानंतर खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. यातल्या दोन प्रकरणांमध्ये खडसेंना क्लीन चीट मिळाली आहे.